काॅलनीचे नाव “मधूबन”मात्र नगरवासियांचे हितं जोपासणारा “कन्हैया” च् नाही.. डबक्यांना आले नाल्याचे स्वरूप..

0
33

हेमकांत गायकवाड

पायी चालणाराही चिखलाने होतोय. कुरूप..वा भाऊ वा.. सुंदर शहर स्वच्छ शहर नगरपालिकेचा डंका तोही आसमानात.. निर्वासितांचे हताश उदगार..मी च् उभा राहतो मलाच करा मतदान भागवत चौधरींनी थोपटले दंड..न.पा.च्या दूर्लक्षाने संतापात सोशल मीडियाद्वारे केले व्हायरलं…!

चोपडा : शहरातील मधूबन कालीन परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आरोग्य विभागात व नगरसेवकांनाही वारंवार विनंती करूनही डोळ्यावर हात व कानावर बोटं ठेवले जात असल्याने संपूर्ण निर्वासित मेटाकुटीला आले आहेत.करावे तर काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आपल्याच घराजवळ तुडुंब पाणी साचले असल्याने वैतागलेल्या भागवत चौधरी यांनी समस्या सोडविण्यासाठी मलाच नगरसेवक निवडणुकीत उभे राहून दोन हात करावयाचे असल्याचे दंड थोपटून निर्वाणीचा इशारा दिला आहे.वैफल्यग्रस्त वक्तव्य करत त्यांनी सोशिअल मिडियावरती लोकांना आवाहनही केले आहे

नगरपालिकेतर्फे या भागात ना गटारी,ना रस्ते,ना सुविधा असा मार्गक्रमण सुरु आहे .या भागात तीन नगरसेवक असूनही कुचकामी ठरत आहे . कोणतेही विकास कामे होत नाही.नावाला मात्र काॕलनीचे नाव”मधूबन”आहे.मात्र इथं कोणताही क्रीष्ण जनतेचा वाली उरलेला नाही.नगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावती भेट दिली खरी पण ती त्याचा दौऱ्याचा भाग होता कि काय? पायी चालणे अवघड असलेला रस्ते खेड्यात ही उरलेले नाहीत पण आपल्या सुंदर शहर स्वच्छ शहराच्या डंका वाजविऱ्या नगरपालिका हद्दीत मात्र बऱ्याचशा काॅलनी परिसरात आहेत.यास जबाबदार रहिवासी का रहिवाशांनी निवडून देऊन आरामदायक खुर्ची बहाल केलेले पदाधिकारी आहेत हेच सांगणे कठीण झालेले आहे.

शहरातील मधुबन, गुरूकुल आदर्श नगर, वाल्मीकी नगर आदीं काॅलन्यांमध्ये सांडपाणी निचरा व्यवस्थापनच नाही मग निर्माण होणारे घाणीचे साम्राज्य आटोपता आटोपिन कसे हा यक्षप्रश्न आहे त्यामुळे या भागातील रहिवासींना विविध आजारांचाही सामना करावा लागत आहे.एकंदरीत या भागातील रहिवासींना सुविधा मिळण्यावर आज तरी प्रश्न चिन्ह आहे.

Spread the love