सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज मंजूर

0
30

जळगांव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत अनुसुचीत जाती जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातून देऊलवाडे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दि. ५ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान शेतकरी असल्याचा पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत ” जोडला नसल्याच्या कारणाने सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला होता..

दरम्यान याबाबत सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर दि. १२/०४/२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांनी शेतकरी असल्याबाबतचा तहसिलदारांचा दाखला सादर केला असून निवडणुक कार्य प्रमाणे उमेदवारी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा उपनिबंधक यांनी सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांचा अर्ज मंजूर झाल्याचे पत्र आज दि. १७/०४/२०२३ रोजी दिले. त्यामुळे सौ. निकिता मोतीलाल उर्फ मुकेश सोनवणे यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Spread the love