वीरेंद्र मंडोरा
12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-शिरसोली विभागात तिसऱ्या मार्गाच्या तांत्रिक कामासाठी रेल्वे वाहतूक ब्लॉक.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तिहेरी जळगाव-मनमाड रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाच्या जळगाव-शिरसोली विभागात, 12 ऑगस्ट रोजी डाऊन लाइनवर* आणि 17 ऑगस्ट रोजी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर पाच तासांचा रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आह. या ब्लॉकमुळे, मुख्य मार्गावर धावणाऱ्या गाड्या नियंत्रित केल्या जातील, म्हणजे त्या थांबवल्या जातील, किंवा नियंत्रित वेगाने चालवल्या जातील. बहुधा या गाड्या त्यांच्या नियमित वेळापत्रकातून उशिराने धावू शकतील. मंडळ व्यवस्थापनाने या विषयावर सविस्तर परिपत्रक लागु केले आहे.
दि.12 ऑगस्ट रोजी नियंत्रित गाड्या – सकाळी 7:45 ते दुपारी 12:45 पर्यंत, डाऊन मेन लाईन.*_
1) 09148 अप,भागलपूर – सुरत *ताप्तीगंगा* एक्स, *जळगाव* स्टेशनवर 10 मिनिटांसाठी थांबविली जाईल.
2) 02103 डाऊन,लो.टि.टर्मिनस – गोरखपूर *संत कबीरधाम* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:00 ते 12:50 पर्यंत एकूण 1 तास 25 मिनिटांसाठी *शिरसोली* स्टेशनवर थांबविली जाईल.
3) 02165 डाऊन,लो.टि.टर्मिनस – गोरखपूर *रत्नागिरी* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:45 ते 12:50 पर्यंत *म्हसावद* स्टेशनवर एकूण 1 तास 05 मिनिटांसाठी थांबविली जाईल.
4) 02259 डाऊन,मुंबई – हावडा *गीतांजली* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:50 ते 12:50 पर्यंत एकूण 1 तास *माहेजी* स्टेशनवर थांबविली जाईल.
5) 02779 डाऊन, वास्को – हजरत निजामुद्दीन *गोवा* सुपरफास्ट एक्स, दुपारी 12:00 ते 12:50 पर्यंत एकूण 50 मिनिटांसाठी *पाचोरा* स्टेशनवर थांबविली जाईल.
6) 05017 डाऊन,लो.टि.टर्मिनस – गोरखपूर *काशी* एक्स, दुपारी 12:35 ते 13:00 पर्यंत एकूण 25 मिनिटांसाठी *पाचोरा* स्टेशनवर थांबविली जाईल.
7) त्याचप्रमाणे मालगाड्यांवरही पद्धतशीर नियंत्रण केले जाईल.
_दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 10:50 ते 15:50 पर्यंत मुख्य मार्ग आणि डाऊन मेन लाईन वर 10:50 ते 12:50 पर्यंत गाड्या नियंत्रित केल्या जातील._
अप लाइन गाड्या
1) 06528 अप,नवी दिल्ली – बँगलौर *कर्नाटका* सुपरफास्ट एक्स, *भुसावळ* स्टेशनवर दुपारी 13:10 ते 15:55 पर्यंत एकूण 2 तास 45 मिनिटांसाठी थांबविली जाईल.
2) 02130 अप,प्रयागराज – लो.टि.टर्मिनस *तुलसी* सुपरफास्ट एक्स, दुपारी 13:30 ते 16:05 पर्यंत *भुसावळ* स्टेशनवर एकूण 2 तास 35 मिनिटे थांबविली जाईल.
3) 02260 अप,हावडा – मुंबई *गीतांजली* सुपरफास्ट एक्स, *भुसावळ* स्टेशनवर दुपारी 13:55 ते 16:15 पर्यंत एकूण 2 तास 20 मिनिटांसाठी थांबविली जाईल.
4) 02533 अप, लखनऊ – मुंबई *पुष्पक* सुपरफास्ट एक्स, दुपारी 13:40 ते 16:00 पर्यंत एकूण 2 तास 20 मिनिटांसाठी *दुसखेडा* स्टेशनवर थांबविली जाईल.
5) 01072 अप,वाराणसी – लो.टि.टर्मिनस *कामायनी* एक्स, दुपारी 14:30 ते 16:00 पर्यंत एकूण 1 तास 30 मिनिटांसाठी *सावदा* स्टेशनवर थांबविली जाईल.
डाऊन लाईन गाड्या
1) 02103 डाऊन,लो.टि.टर्मिनस – गोरखपूर *संत कबीरधाम* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:20 ते 13:00 पर्यंत एकूण 1 तास 40 मिनिटांसाठी *शिरसोली* स्टेशनवर थांबविली जाईल.
2) 02129 डाऊन,लो.टि.टर्मिनस – प्रयागराज *तुलसी* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:40 ते 13:00 पर्यंत एकूण 1 तास 20 मिनिटांसाठी *म्हसावद* स्टेशनवर थांबविली जाईल.
3) 02259 डाऊन, मुंबई – हावडा *गीतांजली* सुपरफास्ट एक्स, सकाळी 11:50 ते 13:00 पर्यंत एकूण 1 तास 10 मिनिटांसाठी *माहेजी* स्टेशनवर थांबविली जाईल.
4) 02779 डाऊन,वास्को – हजरत निजामुद्दीन *गोवा* सुपरफास्ट एक्स, *पाचोरा* स्टेशनवर दुपारी 12:00 ते 13:00 पर्यंत एकूण 60 मिनिटांसाठी थांबविली जाईल.
वरील रेल्वे ब्लॉक लक्षात घेऊन प्रवाशांनी त्यांच्या रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.*