सविस्तर वृत्त असे की. सध्या गेल्या 2 ते 3 महिन्या पासून चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द.खेडगाव. व पोहरा व अन्य गाव परिसरात घरोघरी स्वयंपाकासाठी वापरला जनता घरगुती गॅस हंडी चा तुटवडा इतका भयंकर वाढला आहे की . परिणामी लोकांना गॅस हंडी ऑनलाईन बुकींग करून सुद्धा मिळत नसल्याने गाव परिसरात जनतेत संतापाची लाट उसळत आहे..
कोणतीही गॅस हंडी ऑनलाईन बुकींग करून सुद्धा तात्काळ उपलब्ध होत नाही. महिलांना तात्काळ स्वयंपाक करण्यासाठी गॅस हांडीच मिळत नाही. गॅस धारक हे गॅस हंडी कर्मचारींना फोन लावतात की गावात गॅस हंडी ची गाडी कधी येईल .कर्मचारी सांगतात .उद्या येईल. परवा येईल . वरून हांडिंचा शोल्टेज आहे . अशा प्रकारे जनतेला उत्तरे मिळतात .. तरी सदर चाळीसगाव तालुक्यातील जनतेला तात्काळ घरगुती गॅस उपलब्ध व्हावा हीच जनतेची मागणी आहे.











