पत्रकारितेसमोर सोशल मीडियाचे आव्हान विश्ववेध पत्रकार संघटनेतर्ङ्गे ११ पत्रकारांच्या सन्मानप्रसंगी मनोज बारी यांचे प्रतिपादन.

0
39

जळगाव– लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेसमोर सोशल मीडियाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. यामध्ये आपली विश्वासार्हता टिकवुन, सातत्य राखुन पत्रकारिता करणारेच टिकतील, असा संदेश देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी यांनी आज पत्रकारांना दिला.

पत्रकार दिनानिमित्त विश्ववेध पत्रकार संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जवान फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ईश्वर मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील व मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी मार्ल्यापण करुन अभिवादन केले. पत्रकारितेसमोरील आव्हानांवर बोलताना मनोज बारी पुढे म्हणाले की, आगामी काळ पत्रकारांसाठी मोठा आव्हानाचा काळ आहे. विविध माध्यमांवर विविध माहिती मिळत असल्याने पत्रकार गोंधळून गेले आहेत. मात्र, आपले सातत्य कायम ठेवले व विश्वासार्हता ठेवली तर पत्रकारितेला सोन्याचे दिवस येतील, असे त्यांनी नमूद केले. पत्रकारांचे अधीस्वीकृती, पत्रकारांना मिळणारे विविध फायदे व निवृत्तीनंतरची पेन्शन योजना याविषयीची सविस्तर माहिती देखील बारी यांनी दिली. ग्रामीण भागातील पत्रकारिता टिकविण्यासाठी सर्वांनी अभ्यासपूर्ण पत्रकारिता करण्यासोबतच संबंधित व्यवस्थापनाशी विश्वासार्हता व प्रामाणिक राखणे गरजेचे आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

विश्ववेध राज्य पत्रकार संघटनतर्फे पत्रकार दिनानिमित्त ११ पत्रकार बांधवांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात पत्रकार शशिकांत पाटील, लालचंद अहिरे, देवीदास चौधरी, प्रदिप गोसावी, निवेश शिंदे, देवेंद्र पाटील, युवराज पाटील, संजय निकम, खंडू महाले, संदिपाल वानखेड़े, निरज बोराखडे आदींना ज्येेष्ठ पत्रकार मनोज बारी यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले. यशस्वीसाठी संजय निकम, मिलींद सपकाळे, गौतम सोनवणे, रोहित बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

Spread the love