यावल – तालुक्यातील चुंचाळे येथे खान्देश ची कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षा प्रमाणे मोठ्या भक्तीमय व उत्साहाने साजरा करण्यात आला भजन भारुडे म्हणून भक्तीमय वातावरणात गावातील महिला व ग्रामस्थाच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले याबाबत चुंचाळ्यात दिनांक १५ आँगस्ट रोजी मोठ्या भक्तीभावाने कानबाई ची विधीवत स्थापना करण्यात आली खान्देशची कुलस्वामिनी कानबाई स्थापनेच्या एक दिवस अगोदर चौरगांला बाबुच्या काडी लावून वस्र शिगार परिधान करुन तर काही ठिकाणी नारळाला वस्र परिधान करुन कानबाई ची उभारणी स्थापना केली होती त्याच दिवसापासून हिंदू धर्माच्या पारपांरिक चालत आलेल्या रितीरीवाजाला रोठ म्हणून हा सण साजरा केला जातो या सणाला नौकरीनिमीत्त बाहेर गावाला गेले आहे ते त्या दिवशी एकत्र येतात यांच्या घरी होते कानबाई मातेची स्थापना नथ्थु दौलत पाटील,उत्तम चैत्राम पाटील,निबा शंकर पाटील,नारायण लक्ष्मण नेवे,मधूकर दोधू सावळे अश्या एकुण पाच घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात येते
स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ भजन गायन करीत कानबाईला गावाबाहेर आणले जाते त्या ठिकाणी महिला,पुरुष,मुली मुले असे सर्वजन यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नंतर वाजत गाजत कानबाई ला गाव विहिरीजवळ आनले जाते व विधीवत पुजाविधी करुन पाण्यात विसर्जीत केले जाते यावेळी अरुण कोळी, देवचंद कोळी,सुपडू संदानशिव, वाय.वाय.पाटील,किशोर नेवे,दत्तु नेवे, आबा राजपुत,सरदारसिंग राजपुत ,गोकुळ कोळी यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते