चंद्रकांत भोळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड!

0
41

सुनसगाव – येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान ची सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात आली यावेळी संस्थानच्या त्रैवार्षिक कार्यकाळासाठी चंद्रकांत हेमराज भोळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे व्हा चेअरमन – दिनकर बुधो पाटील, सचिव – प्रविण प्रल्हाद पाटील, खजिनदार – लिलाधर जनार्दन पाटील, संचालक – हभप रमेश गोपाळ पाटील , पुरुषोत्तम प्रल्हाद पाटील, योगेश दयाराम पाटील , चेंडू लक्ष्मण पाटील, सौ चंद्रभागा चावदस पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर हभप रमेश महाराज हे सलग दोन त्रैवार्षिक चेअरमन पदी होते.

निवड झालेल्या संचालक मंडळाने संस्थान च्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Spread the love