चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार ?

0
47

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ -: पतीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत चापटा बुक्यांनी मारहाण करीत घरातील लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची फिर्याद झेड टी एस साळवे नगर, फेकरी शिवार येथील रहिवाशी महिलेने दिली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुरनं२३४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३६२, ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि.२४ आँक्टोबर रोजी सकाळी १० ते १०:३० वाजे दरम्यान पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत आरोपी पती सचिन किशोर बोराडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो नि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि संजय कंखरे करीत आहेत.

Spread the love