चारशे रुपयांची लाच भोवली, शिरपूर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

0
2

जिल्ह्यातील शिरपूर येथील वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी यास धुळे लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराकडून त्याने ५०० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. याची सतत्यता तपासून धोबीला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. यावरून शिरपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावर शिफ्ट करण्याकरीत याचा मोबदला म्हुणुन ५०० रुपयांची लाच मागतील होती. तडजोडीनंतर ती ही रक्कम ४०० रुपये करण्यात आली. हे चारशे रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर येथील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love