प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -तालुक्यातील सुनसगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही किर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.येथे गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी हभप निवृत्ती महाराज शिरसोलीकर यांचे जाहिर किर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी मृदंगमणी हभप शरद पाटील वडली तर गायनाचार्य हभप निवृती महाराज, रमेश महाराज, लिलाधर पाटील,नंदू भोळे , योगेश पाटील, दिनकर पाटील, गजानन विसपूते ,लक्ष्मण पाटील होते.संध्याकाळी ग्रामपंचायत व विकासोच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच गावातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वही व पेन शिवजन्मोत्सव समिती मार्फत बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार जितेंद्र काटे तर आभार महसूल अधिकारी मोहीत पाटील यांनी मानले यावेळी परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.









