कुऱ्हा पानाचे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात लाभार्थी समाधानी !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ -: तालुका महसूल मंडळ छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर टप्पा क्रमांक एक चे दुसरे शिबिर हे कुऱ्हे पानाचे प्र.न. ह्या मंडळात रेणुका माता मंदिर परिसर येथे घेण्यात आले, या शिबिरास जळगाव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुऱ्हे पानाचे सरपंच दुर्गाताई शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार भुसावळ नीता लबडे यांनी केले .कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग ,नोंदणी व मुद्रांक विभाग ,पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि कायद्यांमध्ये झालेल्या नवीन बदलाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले …..सर्व स्त्रियांनी गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. श्रीमंत हारकर यांनी केले तसेच माउथ फूट रोग जनावरांमध्ये आढळणाऱ्या आजारासाठी संपूर्ण जनावरांचे लसीकरण करून घेण्याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांनी आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रीती लुटे नायब तहसीलदार यांनी केले ,आभार प्रदर्शन श्रीमती पूजा अवघडे नायब तहसीलदार यांनी केले .कार्यक्रमाला सर्व नायब तहसीलदार ,मंडळ अधिकारी सर्व, ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक अनेक कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात देण्यात आलेले लाभ

  • विशेष सहाय्य योजना लाभ ७६ ,
  • लक्ष्मी मुक्ती योजना लाभ २७,
  • ई शिधापत्रिका ४७,
  • शालेय विद्यार्थ्याना दाखले वाटप २३९,
  • उत्पन्न,जात,अधिवास प्रमाणपत्र वाटप १०४७
  • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र २५
  • ३६-३६अ नोंदी घेतलेले ७/१२ – ११
  • अपाक शेरा कमी – ७
  • जिवंत ७/१२ – ८२
  • माझा ७/१२ अचूक ७/१२ (भुसावळ तालुका विशेष मोहीम) – ९५ ७/१२

वाटप

  • प्रलंबित फेरफार निर्गती १३८
  • वर्ग २ चे वर्ग १ – १८ ७/१२ वाटप
  • तुकडा शेरा कमी – ८३
  • खाते एकत्रीकरण – १७
  • उपस्थित लाभार्थी संख्या -६७३

शिबिरात गरजूंना योजनांचा लाभ मिळाल्याने खरोखरच समाधान व्यक्त केले.

Spread the love