राज्यात गंभीर परिस्थितीत असताना मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत- संजय राऊत

0
33

राज्यातील शेतकरी पाऊस आणि गारपिटीमुळे अडचणीत आले असताना अशा वेळी मुख्यमंत्री अयोध्येला भेट देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करून अयोध्येला गेले आहेत. अशा परिस्थितीत प्रभू राम त्यांना आशीर्वाद देऊ शकत नसल्याचे मत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

संजय राउत पुढे म्हणाले, “आम्ही प्रभू रामावर विश्वास ठेवतो. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलोही आहोत. पण भाजप कधीच आमच्या पक्षासोबत आला नाही. ते आमची कॉपी करत असून कोण ओरिजिनल आहे आणि कोण डुप्लिकेट आहे हे जनतेला माहीत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अश्या परिस्थितीत मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. राज्य गंभिर परिस्थितीतून जात असताना प्रभु राम मुख्यमंत्र्यांना कसे काय अशिर्वाद देतील?” असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

Spread the love