मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात खासगी गाडी घुसल्याने खळबळ उडाली.

0
11

मुंबई -:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीत खासगी गाडी घुसल्याने खळबळ उडाली. राजभवन येथून वर्षा निवासस्थानी जात असताना मलबार हिलवरील रस्त्यावर हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा वर्षा निवासस्थानी पोहोचत असताना हा ताफा येत असल्याचे पाहून रस्त्यावर असलेल्या खासगी वाहन चालकाने गाडी थांबवली, मात्र नंतर अचानक त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला आडवे जात विरुद्ध दिशेने तो पुढे निघून गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबला. मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असते. मात्र अचानक झालेल्या या प्रकाराने या खबरदारीत कुठे गफलत झाली याबाबत तपास केला जात आहे.

Spread the love