ब्रेकींग : जिल्हा दुध संघातील मुख्य सुत्रधार सी.एम.पाटील पोलीसांच्या ताब्यात !

0
39
High Angle View Of Handcuffs On Floor

जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणात मुख्य सुत्रधार दुध संघातील सी.एम.पाटील यांना अयोध्या नगरातून सकाळी ११ वाजता शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या होत्या. यातील जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी सोमवारी 14 नोव्हेंबर रात्री 9 वाजता संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील, अनिल हरीशंकर अग्रवाल आणि रवी मदनलाल अग्रवाल यांना यापुर्वीच अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यांना अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात होते. त्या अखाद्य तुपापासून चॉकलेट तयार करुन बालकांच्या जिवांशी खेळ केला जात होता.

या प्रकरणातील मुख्य सुत्राधार मानले जणारे सी.एम. पाटील यांना देखील शहर पोलीसांनी अयोध्या नगरातून बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकुण आरोपींची संख्या ६ वर पोहचली आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक रवि पाटील यांनी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात सी.एम.पाटील यांची चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

 

Spread the love