शाळेतून आईसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; भरधाव डंपरची धडक

0
23

जळगाव – शाळा सुटल्यावर आईसोबत घरी जाणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापुर्वी मृत्यू झाला.

शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे यांची मुलगी प्रेरणा (वय ४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता नेमाडे तिला स्कूटीने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनयजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली.

उपचारापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू

जखमी प्रेरणा हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

Spread the love