चिनावल ता.रावेर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उदघाटन ! 

0
26

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – रावेर तालुक्यातील चिनावल येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व महात्मा गांधी तंटामुक्ती सदस्य चिनावल यांनी आयोजीत दि.31/08/2025 रोजी रोजी सकाळी 10.30 वाजता चिनावल गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उदघाटन सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांचे हस्ते व चिनावल गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडले. सदरची ग्रामपंचायत ही सावदा पेालीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 32 गावांपैकी महात्मा गांधी तंटामुक्तीचे स्वतंञ कार्यालय असणारी पहीली ग्रामपंचायत ठरली आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी जितेद्र नेमाडे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष चिनावल, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तनुजा श्रीकांत सरोदे, माजी जि प सदस्य,, पुष्पा तायडे माजी जि प सदस्य, शाहीनबी शेख जाबीर, उपसरंपच, भावना योगेश बोरोले, माजी सरपंच, सुरेखा पाटील, माजी जि प सदस्य, माधुरी नेमाडे माजी सभापती, पं स, रावेर, गोपाळ नेमाडे, मा पं स सदस्य, चंद्रकांत भंगाळे, मा.सरपंच, योगेश बोरोले, माजी सरपंच, उज्वला भंगाळे, माजी सरपंच, सुरेश गारसे माजी सरपंच, दामोदर महाजन, माजी सरपंच, ठकसेन पाटील, दिपक बंडु कोळी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच गावातील सर्व गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व गावातील नागरीक हजर होते. नमदु वेळी सपोनि विशाल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे कौतुक केले असुन गावातील छोठया मोठया भाणगडी हया गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयात सोडविण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करुन महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्यात. सदर वेळी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, बिट अंमलदार विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, निलेश बावीस्कर, राजेश बोदडे, मयुर पाटील, राहुल येवले व इतर स्टाफ हजर होता.

Spread the love