Chopda-रूग्णसेवेच्या बळकटीकरणासाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका पार पाडतील असा आशावाद व्यक्त करून चोपडा मतदारसंघात कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण अनुभवलेच आहेत. या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी अँब्युलन्स प्राप्त झाल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, रूग्णवाहिका चोपडा उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले येथील असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तत्परतेने सार्वजनिक आरोग्य विकास मंत्री मा.ना.डॉ. राजेशजी टोपे व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा करून चोपड़ा मतदरसंघासाठी ३ रूग्णवाहिका मंजुर करून घेतल्या त्याचे आज शासकीय विश्रामगृह चोपडा येथे आमदार लताताई सोनवणे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रूग्णवाहिका चोपडा उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले यांना वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजुभाऊ पाटिल, जिल्हा परिषद सदस्य हरीष पाटिल, माजी उपसभापति एम.व्ही पाटिल, तालुका संघटक सुकलाल कोळी, नगरसेविका मनीषाताई जैस्वाल, विक्की शिरसाट, सुनील पाटिल, गणेश पाटिल, संदीप धनगर, तहसीलदार अनिलकुमार गावित, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, डॉ. प्रकाश लोमटे यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.