हेमकांत गायकवाड
चोपडा : चोपडा तालुका सर्वदृष्ट्या सधन, सुजलाम, सुफलाम आहे.राजकीय वातावरण देखील पोषक आहे.या सर्व बाबी असतांना सुद्धा आपला तालुका पोलीस प्रशासनाच्या रेकॉर्डवर संवेदनशील म्हणून गणला जातो,ही आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल.९८ टक्के लोकं चांगली असतांना केवळ २ टक्के विघ्नसंतोषी डोकी चांगुलपणावर पाणी फिरवत असतील तर चोपडे करांनी कुणाच्या सोबत जायचे हे ठरवले पाहीजे.
या समाजघातकी विचारांच्या इसमांना वेळीच रोखून चोपडा तालुक्याची सकारात्मक प्रतीमा पुढे आणली पाहीजे असे भावनात्मक आवाहन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी केले.ते चोपडा येथील नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्य विधानसभेचे मा.अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, नगराध्यक्षा सौ. मनीषाताई चौधरी,गटनेते जीवनभाऊ चौधरी, घनश्यामआण्णा पाटील,अति. जिल्हा पो अधिक्षक सचिन गोरे,पोलीस उप अधीक्षक राकेश जाधव,तहसीलदार अनिल गावीत आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील गणपती मंडळाच्या अध्यक्षांना सूचीत करतांना डॉ.मुंडे यांनी सांगितले की,या वर्षी सुद्धा कोरोना प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने कुठल्याही मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही.तसेच सार्वजनीक व खाजगी गणपती बसवतांना त्या मूर्तीची उंची ठरवून दिलेली आहे.डी.जे.,डॉल्बी साऊंड यांच्यावर पूर्णपणे बंदी आहे.आपणास देखावे करायचे असल्यास कोरोना जागृती, समाजहित जोपासले जाईल असेच आरास आपण करू शकतात.
अरुणभाईं गुजराती (राज्य विधान सभेचे माजी अध्यक्ष) गटनेत्यांना बोलताना म्हटले की यांनी
शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थे बद्दल जबाबदार धरत गणपती विसर्जनाच्या आत मला चोपडा शहरातील रस्ते खड्डेमुक्त हवेत अशी तंबीच गटनेते जीवनभाऊ चौधरी यांना उद्देशून दिली.
आजच्या शांता समितीच्या बैठकीस तालुका भरातून गणेश मंडळांचे पदाधिकारी,पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य, नगरसेवक,महिला पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते.आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन चोपडा शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले.सुत्रसंचलन पी.सी.पाटील,व सौ.प्रीती पाटील यांनी केले.