चोपडा ग.स.च्या शाखाधिकारीपदी जगन्नाथ बाविस्कर यांची नियुक्ती

0
12

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – ज. जि. स. नो. स. पतपेढी लि. जळगाव उर्फ ग.स.संस्थेतील चोपडा शाखेच्या शाखाधिकारी पदावर जगन्नाथ तुळशीराम बाविस्कर (गोरगावले बु.) यांची नियुक्ती करण्यात आली.सहकार नेते व संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बी.बी.आबापाटील यांनी सन १९८९ मध्ये श्री. बाविस्कर यांची भडगाव शाखेवर लिपीक म्हणुन नियुक्ती केलेली होती.तद्नंतर त्यांनी अमळनेर,यावल, एरंडोल येथेही चांगल्या प्रकारे सेवा बजाविली.सध्या ते शाखा चोपडा नं.५ येथे उपशाखाधिकारी पदावर कार्यरत होते. मुख्यकार्यालयाचे आदेशान्वये सेवाजेष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शाखा चोपडा नं.५ येथेच शाखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.

नोकरी करित असतांना जगन्नाथ बाविस्कर यांनी अाध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सहकार क्षेत्रात विशेष कार्य करून जनमाणंसात व संस्थेत चांगली ओळख निर्माण केलेली आहे.त्यांच्या ह्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय बापु पाटील, समस्तं संचालक मंडळ, व्यवस्थापक वाल्मिकराव पाटील, मुख्यकार्यालय स्टाफ् सोसायटी व हितकारणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विभागीय व वसुली अधिकारी यांचेसह चोपडा शाखेचे अधिकारी कर्मचार्यांनी त्यांचे विशेष स्वागत व अभिनंदन केले आहे.

Spread the love