हेमकांत गायकवाड
चोपडा:आज आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या मंजूर झालेल्या विष्णापूर ता.चोपडा जि. जळगाव येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम (किंमत रु.१४.०० कोटी) चे भुमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले
या प्रसंगी आमदार सौ.लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळिराम सोनवणे शिवसेना सह संपर्क प्रमुख रावेर मतदार संघ, जिल्हा प्रमुख समाधान महाजनसर यांची प्रमुख उपस्थितीत होती.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांनी भविष्यात चोपडा मतदारसंघात विविध विकासकामे होणार असून यात लवकरच आणखी एका आश्रमशाळा इमारत भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सुतोवाच काढले. तसेच या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने लाभलेली उपस्थितीमुळे संपूर्ण चोपडा शिवसेनामय झाल्याचे दिसून येत होते.
यावेळी जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर, चोपडा तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, यावल तालुका प्रमुख रविद्र सोनवणे, भुसावळ तालुका प्रमुख सुभाष चौधरी, महिला तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, जि.प.सदस्य हरीश पाटील, माजी उप सभापती एम.व्ही.पाटील सर, रवी भाऊ चव्हाण, किशोर पाटील, माजी सभापती माणिकबापू महाजन, ए.के.गंभीरसर, नगरसेविका मीनाताई शिरसाठ, नगरसेवक महेंद्र धनगर, राजाराम पाटील, किशोर चौधरी, प्रकाश दादा राजपूत, भैय्या पवार, नामदेव पाटील, अडावद सरपंच भावनाताई माळी, गलंगी सरपंच शीतल देवराज, विष्णापुर सरपंच सखुबाई भिल,माजी सरपंच संजयभाऊ कोळी, अमोल शेटे, रावसाहेब पाटील, उदयभान इंगळे, विधानसभा सेना क्षेत्रप्रमुख विकास पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, गोपाल चौधरी, सुनील पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, सरपंच वरगव्हाण भूषण पाटील, प्रताप पावरा, विकास पाटील, गोपाल पाटील, पी.आर.माळी सर, नंदू गवळी, दिव्यांक सावंत, गोलू मराठे, मंगल इंगळे, आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.