चोपडा पं.स. कडून वर्डी येथील गैरव्यवहाराला अभय; वरीष्ठांचे चौकशी कडे दुर्लक्ष !

0
59

हेमकांत गायकवाड

 

चोपडा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभरा विषयी संबधीत विभागाकडे एक वर्षापूर्वी चौकशीची मागणी केली असून हेतुपूर्वक टाळाटाळ करून गैरव्यहाराला चोपडा पंचायत समिती कडून सरळसरळ अभय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अखेर न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने उद्या शिवाजी चौक चोपडा येथे करण्यात येणार आहे.

14 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झालेला असल्याने उपोषण करते दत्तात्रय विजय पाटील व महेंद्र रतिलाल पाटील यांनी एक वर्षापूर्वी 19 ऑक्टोंबर 2020 रोजी 14 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी करण्याविषयी अर्ज दाखल केला होता. त्याचा वरिष्ठांनी कोणतीही दखल घेतली नाही . मध्यंतरी अनेक वेळा प्रत्यक्ष चौकशीची मागणी केली स्मरण पत्र वरिष्ठांना देऊनही वरिष्ठांनी वर्डी येथील झालेल्या गैरव्यवहारकडे दुर्लक्ष करून चौकशी दडपण्याचा प्रयत्न केला . अखेर 13 सप्टेंबर रोजी उपोषनाणास बसण्याचा इशारा दिला होता परंतु त्यादिवशी चोपडा शहरातील गणपती विसर्जन असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे, त्या दिवशी चे उपोषण रद्द करून ते 16 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी चौक चोपडा येथे उपोषण करते सह ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत 14 वित्त आयोगातून एक कोटी पर्यंत ची कामे ग्रामपंचायत मार्फत केले गेले परंतु एक वर्षापासूनcovid-19 मुळे ग्रामसभा व मासिक सभा शासनाने बंद केल्या होत्या. याचा गैरफायदा सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ,14 वित्त आयोगातून आलेला निधी मनमानी कारभार खर्च करून , really अपूर्ण कामे पूर्ण दाखवण्यात आली आहेत. अनेक वेळा मासिक मिटिंग ची मंजुरी व ग्रामसभांची मंजूरी प्रोसिडिंग मागूनही मिळून येत नाही, गावात बंदिस्त गटारी वरील दापे , गावातील काँक्रीटी करण रस्ते ,पेवर ब्लॉक, ग्रामपंचायती वाल कंपाऊंड, सार्वजनिक स्वच्छालय , ग्रामपंचायत मध्ये शॉपिंग बांधकाम ,गावातील घनकचरा यावरील खर्च, जुनी पाण्याची टाकी दुरुस्ती ,तसेच गावात आरो प्लांट सह झालेली विकास कामे, कमी खर्चात बांधून आज हे निकृष्ट दर्जाची आहेत. काही कामे खर्च करूनही बांधलेले नाहीत ,आरो प्लांट गावात कुठेही बसवलेले नाही .अनेक वेळा संबंधित कार्यालयात माहिती करूनही नागरिकांना माहिती मिळत नाही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कोरोना वायरस नियंत्रणासाठी खरेदी साहित्य ही वाजवीपेक्षा दाखवलेली आहे अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद कडे यांच्याकडे दि.19 ऑक्टोंबर रोजी दिले होते. सदर ग्रामस्थांसह सदस्यांना विश्वासात न घेता झालेले कामे व व्यवहार संशयाच्या कचाट्यात सापडल्यामुळे पुढील चौकशी व कार्यवाही साठी उपोषण करणे अटळ झाले.

Spread the love