हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील जनतेशी माझी नाड..वृध्द,विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि निराधारांना आधारासाठी संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा.. अन् बिचाऱ्या गरजवंतांना जलद गतीने न्याय द्या.. आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे आदेश.. आजच्या बैठकीत ५२१ पगार प्रकरणे तर ०४ कुटुंब अर्थसाहाय्यचे प्रकरणे मंजुर
चोपडा :तालुक्यातील जनतेची सेवा हेच माझे ध्येय असून गोरं गरिब जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत तळागाळातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे नियमांत बसत असलेले वृध्द,विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि निराधारांना आधारासाठी संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा.. अन् बिचाऱ्या गरजवंतांना जलद गतीने न्याय द्या..अशा सूचना करत अशा घटकातील बंधू-भगिंनींसाठी आपले दारं केव्हाहि उघडें आहे.. आपल्या समस्या ह्या माझ्या समस्या म्हणून सदोदित प्रयत्नशील राहिलं असे प्रतिपादन आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तहसील दालनात आयोजित बैठक प्रसंगी बोलतांना केले.
संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी ५२१ पगार प्रकरणे मंजूर करण्यात आले.तर कुटुंब अर्थसाहाय्यचे ०४ प्रकरणे मंजुर करण्यात आले आहेत अशी माहितीही आमदार सौ लताताई सोनवणे यांनी यावेळी दिली.
आज दिनांक ०१/०९/२०२१ रोजी तहसील नविन प्रशासकिय इमारत येथे संजय गांधी निराधार योजना समिती ची बैठक आमदार सौ ताई साहेब लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी श्री अनिलजी गावीत तहसीलदार चोपडा, सचिव, श्री भरतजी कोसोदे गटविकास अधिकारी पं स.चोपडा , श्री राजेन्द्र पाटील सदस्य,सौ रोहिणीताई पाटील,सदस्या,सौ मंगलाताई पाटील,सदस्या, श्री ए के गंभीर सर सदस्य, श्री माणिकचंद पाटील,सदस्य, श्री रामचंद्र उर्फ आबा देशमुखसदस्य,श्री संजीव शिरसाठ,सदस्य, श्री संतोष अहीरे सदस्य, श्री गोपाल चौधरी सदस्य, श्री पोळ साहेब नायब तहसीलदार, हे उपस्थित होते. श्री जाधव साहेब,सौ चहांदे मडम, यांनी सहकार्य केले.शेवटी आभार श्री पोळ साहेब नायब तहसीलदार यांनी मानले.