चोपडा तालुक्यातील कोतवालांचे विविध मांगण्यांसाठी तहसिलदार अनिल गावित; यांना निवेदन !

0
9

हेमकांत गायकवाड  चोपडा : तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या पुर्ण व्हाव्या यासाठी महाराष्ट्र कोतवाल संघटना आंदोलनाच्या दिशेने जाणार असल्याने त्याना न्याय मिळावा यासाठी सर्व कोतवाल संघटना एकवटल्या जात असून सर्वांची एकमुखी मांगण्या करीत आहेत.

महाराष्ट्र कोतवाल संघटनेने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनाला, चोपडा कोतवाल संघटनेचा पुर्ण पाठींबा देण्यात आल्याचे सर्व तालुकास्थरीय पदधिकारी व सदस्यांच्या सहींचे निवेदन मा. चोपडा तालुक्याचे तहसिलदार अनिल गावित ; यांच्याकडे देण्यात आले आहे.सविस्तर निवेदन करण्यात येते कि. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई मंत्रालय येथे दिलेल्या निवेदनास चोपडा तालुका कोतवाल संघटनेच पूर्ण पाठींबा असून कोतवालांच्या सदरील मागण्या दि. १५ ऑगष्ट २०२१ पर्यंत मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलनात तालुका कोतवाल संघटना चोपडा चा पूर्ण संख्येने पाठींबा असेल.

तरी मेहरबान साहेबांना इमानेइतबारे २४ तास शासनाची व जनतेची सेवा करणाऱ्या कोतवालास आंदोलनाची वेळ येऊ न देता. आमच्या मागण्याच्या सहहृद्यतेने सहानुभूती पूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात जेणेकरून आम्हास आमच्या मुलभूत गरजा पूर्ण करून किमान समाधान कारक जिवन जगता येईल. अशा प्रकारे कळकळीची नम्र विनंती.. या प्रमाणे निवेदनात मांगणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष – चंद्रकांत सरदार

तालुका उपाध्यक्ष- अजयकुमार महाजन , तालुका सचिव- विकास पाटील, राजेश बारेला

तालुका घटक – सदानंद भदाणे जिल्हा सल्लागार – अमीन पिंजारी- जि.कार्य. सदस्य जितेंद्र धनगर व महिला सदस्य हेमलता कोळी, नसीमा तडवी,यासह आदी कोतवाल उपस्थीत होते.

Spread the love