चोपडा तेली समाजातर्फे जिल्हा तेली समाज पदाधिकार्‍यांचा सत्कार.

0
13

हेमकांत गायकवाड

चोपडा- दिनांक 8 ऑगस्ट 20 21 रोजी श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी यांचा चोपडा तेली समाजातर्फे सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ निर्मला ताई रामचंद्र चौधरी यांचा सत्कार सौ नम्रता प्रशांत चौधरी यांनी केला. श्री प्रशांत सुरेश सुरडकर नाशिक विभागीय युवक महासंघाचे कार्याध्यक्ष यांचा सत्कार चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष श्री टी. एम .चौधरी सर यांनी केला. प्रसिद्ध उद्योगपती व्यापारी श्री रामचंद्र शेठ यांचा सत्कार चोपडा तेली समाजाचे विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी यांनी केला. यावेळी जिल्हा तेली समाज अध्यक्ष श्री के. डी .चौधरी सर, विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी, गोपीचंद रघुनाथ चौधरी ,देवकांत कालिदास चौधरी यांचेसह प्रकाश श्रावण चौधरी, जितेंद्र प्रकाश चौधरी, सूर्यकांत के चौधरी, मदन मिस्तरी आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी ग. स. चे संचालक श्री देवेंद्र भास्करराव पाटील यांचा भावपूर्ण भावपूर्ण सत्कार करण्यात येऊन यांच्या शुभहस्ते सपत्नीक संताजी जगनाडे महाराजांची आरती करण्यात आली.

Spread the love