हेमकांत गायकवाड
चोपडा: संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडा तर्फे 6 सप्टेंबर 2021 रोजी बैल पोळा हा सण साजरा करण्यात आला. यावेळी बैलांची, गाईंची व गोवंशान्ची आन्घोळ करून त्यांना सजवण्यात आले. त्यांची पूजा करून पुरणाची पोळी खाउ घालन्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ धनश्री देवकांत चौधरी यांनी पूजन केले. यावेळी देवकान्त चौधरी यांनी समस्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन गोवंशाचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले. यावेळी ह-भ-प गोपीचंद महाराज, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के .डी .चौधरी सर व अन्य मंडळी उपस्थित होती.