हेमकांत गायकवाड
चोपडा : येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात अल्पसंख्याक व प्रौढशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. आयोजित 8 सप्टेंबर 2021रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस -सप्ताह साजरा करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले.पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी तालुक्यातील केंद्रप्रमुख अशोक साळुंखे,नरेंद्र सोनवणे,अशोक सैंदाणे, दीपक पाटील ,वंदना बाविस्कर ,उत्तम चव्हाण, भरत शिरसाट, राकेश पाटील, प्रमोद बाविस्कर चोपडा तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील,उपाध्यक्ष मंगेश चौधरी, जळगाव मुख्याध्यापक संघ सहविद्या सचिव सतिष पठार,जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक ,इंग्रजी विभाग सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी साक्षरतेवर आधारित चाळीस चौरस फुटाची भव्य रांगोळी साकारत गीत गायन केले. तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापकांनी ग्राउंडवर एकत्र उभे राहून साक्षरतेचा लोगो तयार करत समाजातील निरक्षर लोकांनी साक्षर होण्याबाबत संदेश दिला. मुख्याध्यापकांनी असा लोगो तयार करणारा महाराष्ट्रातील पहिला चोपडा तालुका आहे. याची संकल्पना व डिझाईन राकेश विसपुते यांनी केली. त्यांना संजय बारी ,व्ही. डी. पाटील, अनुज बडगुजर यांचे सहकार्य लाभले.