महेंद्र सोनवणे
चोपडा : रामपुरा भागातील रहिवासी पत्रकाराला एकाने जबर मारहाण करून जीवे मारण्याची दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पत्रकारास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, रामपुरा भागातील रहिवासी पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांच्या घराच्या पत्रांवर शेजारी राहात असलेल्या गणेश रमेश जाधव याने दगड मारला असता पत्रावर दगड का फेकतो असे विचारण्यास गेला असता गणेश जाधव
यास राग येवून त्याने लाकडी पाटीने पत्रकारास जबर मारहाण केली. व तुला येथे राहू देणार नाही,जीवे ठार मारू अशी धमकी दिली.याप्रकरणी शहर पोलिसात हेमकांत गायकवाड यांचे तक्रारीवरून गणेश जाधव यांचे विरुद्ध
पोलीसात पनाका रजि. 440/2021 भादंवि कलम 323,504, 506, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोहेकाॕ संतोष पारधी हे करीत आहेत.
यापुर्वीही अनेक ठिकाणी अशाच प्रक्रारे पत्रकारांनवर भ्याड हल्ले करण्यात आले आहे . बर्याच प्रकरणामध्ये संबधीतांन विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जास्तच फावते तरी याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करुण सदर इसमा विरोधात कठोर कारवाई करावी .