चोपड्यातील ऐतिहासिक परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव यंदा स्थगित… कोरोणामुळे महामारीमुळे श्री बालाजीची जागेवरच विधिवत पुजा…

0
43

चोपडा येथील श्री. व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे नवरात्र उत्सवात पार पडणारा वहनोत्सव व रथोत्सव यंदा कोविड १९ महामारीच्या निमित्ताने शासनाने घातलेल्या निबंधांमुळे स्थगित करण्याचा निर्णय संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी यांचे मार्गदर्शनाखाली विश्वस्त प्रवीण गुजराथी यांनी जाहिर केला होता.

तथापि वहनोत्सव व रथोत्सव भाविकांच्या श्रध्दांचा विचार करता मंदिरातच साजरा करण्यात आला. आज विधासभेचे माजी अध्यक्ष प्रा अरूणभाई गुजराथी यांच्या प्रमूख उपस्थितीत रथाची व श्री व्यंकटेश बालाजीची जागेवरच विधिवत पूजन करून रथाचा उत्सव साजरा करण्यात आला सदर उत्सवास सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा असल्याचे प्रा अरूणभाई गुजराथी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कोरोणाच्या व शासनाच्या नियमानुसार रथ यात्रा न भरवता जागेवरच विधिवत पूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व भाविकांनी गर्दी न करता श्री व्यंकटेश बालाजीचे दर्शन घ्यावे असेही ते म्हणाले. . . .
. यावेळी चक्र पूजन प्रतिक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रथ पूजन प्रसंगी प्रा अरूणभाई गुजराथी, घनश्याम अग्रवाल, विजय दत्तात्रय पाटील, ऋषिकेश रावळे, पोलिस निरीक्षक अवतरसिंग चव्हाण, प्रविणभाई गुजराथी, भूपेंद्र भाई गुजराथी, विक्रम देशमुख, विनोद हुंडीवाले, आनंदराव देशमुख, प्रवीण भाई गोपालदास गुजराथी, संजय सोमाणी, दीपक भानुदास पाटील, लालाभाई गुजराथी, शांताराम लोहार, सोमनाथ वारुळे, रणजित देशमुख, संग्राम देशमुख, मोगरी लावणारे युवराज आबा महाजन, युवराज पारधी, चेतन लोहार , संजय लोहार, महेश लोहार आदी उपस्थित होते..
या बाबत अधिकृत वृत्त असे की, श्री
व्यंकटेश बालाजी संस्थानने सुमारे पाचशे साडेपाचशे वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव यंदा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला. चोपड्याची सांस्कृतिक विरासत असलेला वहनोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते विजया दशमी या नवरात्र काळात शेकडो वर्षांपासून सुरु आहे. नवरात्रीचे नऊ दिवस श्री.बालाजी महाराज विविध वहनांवर आरुढ होवून शहरातील विविध भागात भक्तांना भेटीसाठी जात असल्याची परंपरा आहे. या वहनोत्सवाचे जोरदार स्वागत होत असे भाविक आपआपल्या परिसरांत श्रद्धेने आरती देवून बालाजींचे स्वागत करीत असत. तसेच श्री. व्यंकटेश बालाजी मंदिरापासून एकादशीला रथोत्सवनिमित्त रथारुढ श्री बालाजींचा रथ निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री भाविकांना दर्शनार्थ मुक्कामी ठेवण्याची परंपरा आहे. तर द्वादशीला बाजारपेठ मार्गाने .
. बालाजी महाराजांचा रथ मंदिरात जवळ परत येण्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्यानिमित्ताने शहरात यात्रा भरण्याची मोठी परंपरा पहिल्यांदाच स्थगित होत आहे. यावर्षी दि.७ ते १५ आक्टोबर दरम्यान वहनोत्सव मंदिरातच पार पडला. तर दि. १६ रथोत्सव सालाबादाप्रमाणे जागेवरच पार पडला. मात्र कोविड १९ महामारीच्या संसर्गाचा विचार करता हा उत्सव यंदा स्थगित करण्यात आली.

Spread the love