प्रभाकर सोनवणे यांना चोपड्यातून उमेदवारी

0
32

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

चोपडा -: चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) गटाकडून नाट्यमयरित्या उमेदवार बदलविण्यात आला असून उबाठा गटाने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला असून प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी देवू केली आहे. सुरुवातीला शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना उबाठा गटाकडून ए.बी फॉर्मही देण्यात आला असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. एकाच मतदारसंघात उबाठा गटाकडून दोन उमेदवार घोषित झाले असल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या काही स्थानिक नेत्यांनी राजू तडवी यांच्या नावाला विरोध केला होता. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे तडक मुंबईत दाखल होत त्यांनी सूत्र हलविल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.

भाजपाचा चेहरा हेरला

प्रभाकर गोटू सोनवणे हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून जिल्हा परिषदेत ते सभापती देखील राहिले आहे. गेली पंचवार्षिक निवडणूक त्यांनी अपक्ष लढविली होती. शिवसेना उबाठा गटाने भाजपाचे चेहरा हेरला असून सोनवणे विरुद्ध सोनवणे असा सामना येथे होणार आहे.

Spread the love