चोरलेल्या दुचाकी शिरसोली शिवारात लपविल्या.

0
54

जळगाव -शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरणार्‍या रमेश फुलसिंग देवरे (२१, मुळ रा.सेंधवा, मध्य प्रदेश ह.मु.शिरसोली, ता.जळगाव) या संशयिताला रविवारी दुपारी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरलेल्या दुचाकी ह्या शिरसोली शिवारातील शेतात लपविल्या होत्या, अशी माहिती तपासात समोर आली असून त्याच्या ताब्यातून दोनही दुचाकी व एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी व एक मोबाईल चोरी झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, दीपक शिरसाठ, विजय खैरे, उमेश पवार, रवींद्र चौधरी व विजय खैरे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत मध्य प्रदेशातील रमेश देवरे या सराईत गुन्हेगाराचे नाव समोर आले होते. त्यानुसार रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने रविवारी शिरसोलीत जावून त्याला अटक केली. संशयित रमेश देवरे यानेच ९ सप्टेंबर रोजी संभाजी नगरातील हेमंत बाळकृष्ण जोशी यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल व दुचाकी लांबविली असल्याचेही समोर आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दीपक शिरसाठ करीत आहे.

Spread the love