जीर्ण पाण्याची टाकी पाडुन नविन टाकी सुरु करण्याची मागणी, जीवित हानी होण्याची शक्यता.

0
42

ममुराबाद -: संभाव्य होणारी जीवित हानी टाळण्यासाठी जीर्ण अवस्थेत असलेली टाकी पाडण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरत असून जळगाव तालुक्यातील ममुराबार येथील गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जि. प. ने सदरील टाकी 1972 साली बांधली सदर टाकीस 49 वर्ष झाले.

या टाकीचा वापर सुरळीत सुरु असल्याने व टाकीचे बांधकाम उखडले गेले असुन ती खिळखिळी झाली आहे . त्यामुळे कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. परंतू टाकी पाडून टाकण्याच्या मागणीकडे ना शासन ना पुढारी ना ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने जीर्ण टाकी उभी आहे.

जोरदार पाऊस, किंवा वादळी वाऱ्यात टाकी कोसळली तर गावातील, तसेच टाकीखाली व जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांचा विनाकारण जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी जुनी झालेली पाण्याची टाकी पाडण्यात यावी.अशी मागणी परिसरातून होत आहे. या टाकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा संभाव्य धोखा टाळण्यासाठी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.पर्यायी पाण्याचा पुरवठा करणारी नवीन टाकी शेजारीच तयार असुन देखील ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे हेतु पुरस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे . याबाबत ग्रामस्थांनी बऱ्याच वेळेस तोंडी व लेखी तक्रारी देऊन सुद्धा आज पर्यन्त टाकी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही . सदर जिर्ण झालेली टाकी पाण्याच्या वजनाने पडल्यास व त्यात जिवीत हाणी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरीकांना पडलेला आहे .

Spread the love