यावल तालुका प्रतिनिधी(दिपक नेवे)
यावल -चुंचाळे येथे दि १५ ऑगस्ट २० २१ रोजी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष दिपक कोळी यांनी स्वता ध्वजारोहण न करता त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ.माधुरी मिथुन गजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या शुभ प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिपक कोळी उपाध्यक्ष श्री.लुकमान तडवी,व सदस्य व चुंचाळे सरपंच सौ.सुनंदा संजय पाटील व चुंचाळे ग्रामसेवक सौ.प्रियंका बाविस्कर व अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ,गावातील जेष्ठ नागरिक,महिला, पुरुष ग्रामंस्थ आदी उपस्थित होते