तालुका कृषी अधिकाऱ्याचे सिनेस्टाईल अपहरण ; जळगाव जिल्ह्यातील घटना

0
13

जळगाव – जिल्ह्यातील बोदवड शहरातील उजनी रस्त्यावर एखाद्या चित्रपटात साजेशी घटना सोमवारी घडली असून यात पीक पाहणीसाठी गेलेल्या बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहांगीर पाडवी (५७) यांचे सोमवारी सायंकाळी अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली.

बोदवड तालुका कृषी अधिकारी पाडवी हे सोमवारी सायंकाळी एका शेतात पीक स्थितीची पाहणी करण्यासाठी जात होते. बोदवडपासून दोन किमी अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या एका चारचाकीने अडविले. त्यातून उतरलेल्या तरुणांनी कृषी अधिकाऱ्याच्या चालकाला तिथेच सोडून कृषी अधिकाऱ्यास त्यांच्या वाहनात बसवून ते घेऊन गेले. हा प्रकार चालकाने कृषी अधिकारी कार्यालय गाठत कथन केला. यानंतर कृषी कार्यालयातील कर्मचारी पोलिस ठाण्यात पोहोचले. याबाबत पाडवी यांचा वाहनचालकाच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच कुर्ला पोलिस ठाण्याचे कर्मचारी नारसिंग पाडवी हे कृषी अधिकारी छगन पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले. छगन पाडवी हे कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी असून त्यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने २५ मे रोजी फेटाळला आहे, अशी माहिती आहे, अशी माहिती त्यांनी बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली. याबाबत पाडवी यांचा वाहनचालकाच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Spread the love