किराणा दुकानात दारू विक्रीबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवावा..  जागतिक आरोग्य दिनानिमीत्त जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन. 

0
51

चोपडा(प्रतिनिधी) राज्य सरकारतर्फे किराणा दुकानात दारू (वाईन) विक्रीचा निर्णय घेण्यात आला असून जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी व्यसनाधीन बनविणारा हा निर्णय आहे.दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.शासन एकीकडे व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदान देते तर दुसरीकडे किराणा दुकानातून दारूविक्री बाबतचा निर्णय घेऊन एक प्रकारे राज्यातील जनतेला व्यसनाधिन करित आहे. याबाबत राज्यभरातून मिडिया तसेच सामाजिक संस्था संघटना व विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध व टीकाही केलेली आहे.तरिही याबाबत जनमत घेऊन निर्णय घेण्यात येईल यासाठी सरकार नागरिकांकडुन हरकती व सूचना मागवित आहे.दारूचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय रद्द करावा व जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.यासाठी सर्वसामान्य जनतेसह सुज्ञ व दक्ष नागरिक तसेच महिलामंडळांनी दि.२९ जूनपर्यंत ‘आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभाग,महाराष्ट्र राज्य,दुसरा मजला,जुने जकात घर,शहीद भगतसिंग मार्ग,फोर्ट, मुंबई-४००००१ या पत्त्यावर टपालाद्वारे अथवा ‘dycomm – inspection @ mah.gov.in’ या ‘ई मेल’ पत्त्यावर हरकती,सूचना, विरोध व आक्षेप नोंदवावा,असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा..

किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते.लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या दुकानांमध्ये किराणा माल घेण्यासाठी जात असतो.अशा ठिकाणी दारूची विक्री झाली तर दारुड्यांना सहजच दारू मिळणार आहे.आज वाईन विक्री होईल उद्या छुप्या मार्गाने त्या ठिकाणी गावठी देशी दारूही विकली जाईल.जास्त नफा मिळतो म्हणून दुकानदारही जास्त दारूचीच विक्री करतील.यातून कुटुंबव्यवस्था मोडकळीस येईल.म्हणुनच सरकारने किराणा दुकानात वाईन (दारू) विक्रीचा निर्णय बदलला पाहिजे..

जगन्नाथ बाविस्कर

(माजी संचालक..कृ.उ.बा.समिती,चोपडा)

Spread the love