हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उंचीने उघडलेले असून तापी नदी पात्रातून सद्यस्थितीत 41032 क्युसेस इतका विसर्ग सुरूअसून आज संध्याकाळी 80 हजार क्सुसेस ते 1 लाख 25 हजार क्युसेस पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन जळगाव व कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये, पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये.जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारेपासून सावध राहावे, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे जळगाव जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.










