जळगाव -: उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे जळगावसह महाराष्ट्रातील तापमानात कमालीची घट झाली असून यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीने राज्य गारठला आहे. खान्देशातही तापमानात नीचांकीवर पोहोचले असून यातच हवामान खात्याने राज्यातील ९ जिल्ह्यांना हवामान खात्याने थंडीचा यलो अलर्ट दिला आहे.
जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, पुण्याचा घाटमाथा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. धुळ्यात तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत घसरला आहे. तर जळगावचे किमान तापमान ८ अंशाखाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
जळगावात आज कसं राहील तापमान?
महाराष्ट्र गारठला असून सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी जळगावच्या तापमानाचा पारा ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून जळगाव शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. आज सोमवारीही कडाक्याची थंडी जाणवू शकते. या दिवशी किमान तापमान ७ ते ९ अंश तर कमाल २८ ते ३० अंश दरम्यान असेल.