कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा, येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक तर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिवस ऑडनलाईन वक्तृत्व स्पर्धा संपन्न.. 

0
11

हेमकांत गायकवाड

चोपडा : दि. १२ ऑगस्ट २०२१, गुरुवार रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा, जि. जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक तर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिवस ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे झूम या आभासी माध्यमावर आयोजीत करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.ए. ल.चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला NSS कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.के.लभाणे यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी अंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यामागची मनोभूमिका मांडली. आजचा युवक समाजात वावरत असताना कोणत्या नैतिक बाबींचा अंगीकार करावा व आपले आचरण कसे आदर्शवत राहील याचे अधिष्ठान अशा कार्यक्रमातील सहभागामुळेच प्राप्त होते असे मत मांडले.*सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी असणारे विषय हे युवक आणि समाजमाध्यमे,युवक व राजकीय कौशल्य,युवक व 21 व्या शतकातील आव्हाने,युवक व सामाजीक/राजकीय जबाबदारी असे युवकाला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आलेले होते.

रासेयो च्या 24 स्वयंसेवकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात प्रामुख्याने कु. कविता बोरसे,ज्ञानेश्वर जोशी,कु.मोक्षिका सुलताने,इ.ने उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले.

उपप्राचार्य मा. प्रा. डाॅ. के. न. सोनवणे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे NSS युनिट अतिशय उत्कृष्टपणे कार्य करीत आहे कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.के.लभणे सहायक कार्यक्रम अधिकारी श्री.विशाल हौसे सर व श्रीमती.एस.बी.पाटील विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्य सातत्याने करीत असतात.

NSS चे स्वयंसेवक यांनी अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे व स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे असे आव्हान केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा डॉ.ए. एल.चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले व निश्चितच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला.

सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल हौसे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भदाणे यांनी केले कार्यक्रमाच्या येशस्वितेसाठी डॉ.लालचंद पटले श्रीमती. एस. बी. पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण youtube करण्यात आले होते.

कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या बरोबरच जळगाव परिसरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली.

Spread the love