जळगाव :- आजच्या काळात संपूर्ण देशभरात संविधान खतरेमे है चे नारे लागत आहेत, सर्वोच्य न्यायालयात संसद श्रेष्ठ की संविधान श्रेष्ठ असा वाद होतो, अनेक तरुण संविधान विरोधी नारे देतात, काही माथेफिरू तिला जाळून टाकतात, काही तथाकथित उच्यभृ तिची टिंगल करून टाळ्या मिळवतात, काही संघटना संविधानाच्या विरुद्ध अभियान राबवितात ही परिस्थिती अशीच राहिली तर देशात समता, स्वातंत्र्य सारखी उच्य मूल्ये शिल्लक राहणार नाही व देशात अराजकता निर्माण होईल त्या करिता संविधान जागर व त्या विषयीच्या स्पर्धा तरुणांना नक्कीच नवी दिशा देईल असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव तर्फे आयोजित राजेंद्र भालेराव स्मृती संविधान जागर करंडक स्पर्धा दिनांक १५ ऑगस्ट रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असता त्याचे उद्घाटन करताना वाघ बोलत होते.
आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन स्वरूपाची ही स्पर्धा होती यात ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आंतर शालेय स्पर्धेत कुमारी वैष्णवी पाटील ने प्रथम क्रमांक , काव्या फेगडे द्वितीय, काव्या पवार तृतीय उत्तेजनार्थ दिशा सूर्यवंशी, प्रथमेश गौरव तर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कुमारी कावेरी नेरकर प्रथम क्रमांक, आलिया बी अमजद द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या प्रसंगी फक्त ४ वर्षीय प्रेरणा राजेंद्र बाविस्कर या मुलीने अतिशय सुस्पष्ट स्वरूपात प्रस्तावना तोंडपाठ म्हणून दाखविली तिला १००० रुपये रोख स्वरूपात देण्यात आले . नाट्यकर्मी उदय सपकाळे व सामाजिक कार्यकर्त्या सुश्मिता भालेराव यांनी परीक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेला व त्यांचे आई , वडील हजर होते. प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या , विलास यशवंते , कुलदीप भालेराव मुख्य अतिथी म्हणून हजर होते . सूत्रसंचालन शरद भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन प्रशांत सुरवाडे यांनी केले.