सुनसगाव स्मशानभूमीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे – उपसरपंच एकनाथ सपकाळे

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे सुरू असलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हे बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्यात यावी अशी मागणी सुनसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सुनसगाव स्मशानभूमीत नविन बांधकाम सुरू आहे परंतु हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच इस्टीमेट प्रमाणे काम होत नसून सिमेंट , आसारी चे प्रमाण कमी आहे तर काही ठिकाणी वरच्या वर बांधकाम केले जाते आहे.एवढेच काय तर छतावरील स्लॅब खाली झुकला आहे त्यामुळे दहा लाख रुपयांचे हे बांधकाम असून नेमका या कामाचा ठेकेदार कोण ? हे समजत नसून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करुन व झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडून नव्याने बांधकाम सुरू करावे अशी मागणी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी केली आहे.

Spread the love