चोपडा – “गुरु ब्रम्हा गुरु विष्ण गुरु देवो महेश्व गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः” गुरु शिष्याचे नाते अगदी प्राचीन काळापासून सर्वांना ज्ञात आहे.एकलव्याने द्रोणाचार्यांकडून धनुर्विदयेचे शिक्षण घेतले.राम आणि श्रीकृष्णाने घरापासुन दूर राहून ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतले.गुरुविन कोण दाखविल वाट .आई नंतर जीवनाला कलाटनी देणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय.जगभरात तसेच भारतात शिष्य गुरुविना अज्ञानी आहे.गुरु शिष्य नातं पुरातन काळापासून पृथ्वीवर रूढ आहे.
चिनमध्ये १९३१ ला नेशनल सेंट्रल यूनिवर्सिटी मध्ये शिक्षक दिनाची सुरुवात झाली.१९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिन २७ ऑगस्ट हा दिवस तर यूनेस्कोने ५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस घोषीत केलेला आहे.
भारत देशात स्वतंत्र भारताचे दूसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस *राष्ट्रीय शिक्षक दिन* म्हणून साजरा करतो.डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुपती जवळ तिरुतानी गावात झाला.लहानपणापासुन स्वतः वाचलेल्या विषयावर मनन,चिंतन करत. प्रारंभिक शिक्षण आपल्या गावी तर पुढील तिरुपतीला झाले.कॉलेज मध्ये शिक्षण घेताना खर्च चालवण्यासाठी शिकवण्या घेत.पुढे दर्शनशास्त्रात एम.ए. केले.१९२९ मध्ये ब्रिटीश साम्राज्याच्या विश्व विद्यालयांच्या संमेलनात इग्लंडला गेले.सन १९३१ मध्ये आंध्र विश्व विद्यालयात उपकुलपती पदावर नियुक्त झाले.शिकागो विश्व विद्यालयात अनेक व्याख्याने दिली.इंग्लंडमध्ये पोपने त्यांना सन्मानित केले.ब्रिटीश सरकारने *सर* पदवी प्रदान केली.नंतर त्यांना रशियात भारताचा राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले.अशाप्रकारे विभिन्न रुपात देशाची सेवा करत डॉ. राधाकृष्णन १९५२ मध्ये भारताचे उप राष्ट्रपती झाले.१९५४ मध्ये ‘भारतरत्न’देवून गौरविण्यात आले.१९६२ मध्ये राष्ट्रपती पदावर नियुक्त केले गेले.
डॉ. राधाकृष्णन एक प्रख्यात शिक्षक ,निर्भिड,स्वाभिमानी,महान देशभक्त होते.म्हणून त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर भारत देशात ‘शिक्षक दिन’म्हणून साजरा केला जातो.
आपल्या भारतात शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून तसेच विविध सेवाभावी संस्थेकडून आदर्श,गुणवंत,भारत निर्माण असे अनेक पुरस्कार दिले जातात. तसेच आदर्श,हुशार,प्रामाणिक, हुरहुन्नरी, नम्र विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तु ,गुलाब पुष्प देवून गौरविण्यात येते. या दिवशी विद्यार्थी शाळा सांभाळतात.मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्यांची भुमिका पार पाडतात.विद्या ही महत्वपूर्ण आहे पण विद्यादान करणारा गुरु हा अधिक श्रेष्ठ आहे,असे आपण मानतो.
समाजातील प्रत्येक गुरुंना वंदन!!!
श्री.मयुरेश्वर रोहिदास सोनवणे
उपशिक्षिक-बालमोहन विद्यालय, चोपडा ता.चोपडा जिल्हा-जळगाव