साकेगाव येथे परस्पर विरोधी गुन्हा दाखल 

0
48

भुसावळ – साकेगाव येथील श्री भवानी मातेच्या यात्रेत महिलेचा विनयभंग व एकाला मारहाण करुन मोटरसायकलीचे नुकसान केल्याने दोन जणांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल राजू पटेल रा साकेगाव यांनी फिर्याद दिली आहे की दि.२३ एप्रिल रोजी श्री भवानी मातेच्या यात्रेत रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील महिलेचा पदर ओढल्याच्या संशयावरून तिचे नातेवाईक विलास संतोष पाथरवट, आकाश नारायण पाथरवट, दिपक काशिनाथ कोळी, आकाश सुखदेव भोई व सोबत चे ३ ते ४ इसमांनी गैर कायद्याची मंडळी गोळा करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व एफ झेड एस गाडीची तोडफोड केली व मारहाण केली अशी तक्रार दाखल केली असल्याने भाग ५ सीसीटीएन एस नं ९४/२०२४ भा दं वि कलम १४३,१४७,१४६,१४९,४२७,३२३म.पो.कायदा १३५ ३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या तक्रारीत फिर्यादी महिला रा . साकेगाव यांनी सांगितले की आरोपी साहिल राजू पटेल याने दि २३ एप्रिल रोजी रात्री ८:४० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या साडीचा पदर ओढून तू मला खूप आवडते असे म्हणून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने आरोपी साहिल राजू पटेल रा साकेगाव याच्या विरुद्ध भाग ५ सीसीटीएन एस नं ९७/२०२४ भादंवि ३५४,३५४ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोऊनि पूजा अंधारे करीत आहेत.

Spread the love