अमीर पटेल
यावल-:राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभागात यावल बस स्टॅन्ड आवारातील परवानाधारक टी स्टॉल दुकानदाराने मुलींची छेडखानी केल्याने आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान यावल एसटी स्टँड आवारात कॉलेजमधील मुला मुलींची तसेच यावल शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली पोलिसांनी संबंधित टी स्टॉल मालकास ताब्यात घेतल्याने पुढील अप्रिय घटना टळली आहे,याबाबत यावल एसटीस्टँड आवारात कायमस्वरूपी एक पोलीस बंदोबस्त तैनात करायला पाहिजे अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल एसटी स्टँड आवारात एसटी महामंडळाने टी स्टॉल दुकान सुरू करण्याबाबत परवाना दिला आहे,टी स्टॉल दुकानदाराच्या अनेक तक्रारी होत्या आणि आहेत,त्यांने आज सकाळी कॉलेजमधील एका मुलीला मोबाईल नंबर मागून तसेच छेड़खानी केल्याने कॉलेजमधील मुला,मुलींमध्ये मोठा तीव्र समता व्यक्त करण्यात आला व बस स्टँड आवारात मोठी गर्दी झाली ती स्टॉल मालक दुकानातून पंधरा ते वीस मिनिट एसटी डेपो आवारात लपून बसल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडल्याने घटनास्थळी यावल शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
यावल एसटी स्टँड आवारात शाळा कॉलेज सुटल्यानंतर एसटी बसने जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बस स्टँड आवारात होत असते त्यावेळी यावल बस स्टॅन्ड आवारात मोटर सायकल वरून छेड काढणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते व किरकोळ भांडण होत असतात त्यामुळे यावल बस स्टँड आवारात दररोज पोलीस बंदोबस्त लावल्यास अशा घटनांना आळा बसेल असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. याप्रकरणी यावल पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.