कॅनडा -कॅनडामधील क्युबेक प्रांतातील आरोग्य मंत्रालयाने एक मोठी चूक ट्विटरवर केलीय. कोव्हीड पोर्टलची लिंक ट्विटरवरुन पोस्ट करताना चुकून मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली. पॉर्नहब वेबसाईटवरील एका पेजची लिंक मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र मंत्रालयाने तातडीने हे ट्विट डिलीट केलं.
“आमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या परिस्थितीमुळे आमच्या ट्विटर हॅण्डलवरुन अयोग्य कंटेंटची लिंक पोस्ट करण्यात आली,” असं मंत्रालयाने एएफपी या वृत्तसंस्थेला या संदर्भात पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे. या ट्विटर हॅण्डलला एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अर्थात या चुकीचा परिणाम लगेच दिसून आला. अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करत मंत्रालयावर निशाणा साधला. काहींनी अशी चूक होऊच कशी शकते असं म्हणत टीका केली तर काहींनी काय गंमत चालवली आहे अशी उपहात्मक टोलेबाजी केली.
पॉर्नहब ही जगभरामध्ये अश्लील कंटेटसाठी ओळखली जाते. ही वेबसाईट माइंडग्रीक कंपनीच्या मालकीची आहे