अवैध गौण खनिजाची वाहतूक : ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल

0
11

यावल : शहरातील सुदर्शन चौकातुन ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या गौण खनिज भरून चोरी करून नेत असतांना एकास तलाठी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, संबंधीत हा न थांबता पसार झाला.झाला. या प्रकरणी यावल पोलिसात तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तलाठ्याने केला थांबण्याचा इशारा मात्र चालकाने काढला पळ

यावल शहरातील सुदर्शन चौकातून एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या गौण खनिज चोरी करून वाहतूक करताना कासीम खान नसीर खान (अक्सा नगर, यावल) हा दिसून आला. त्यास टाकरखेडा येथील तलाठी उमेश उध्दव बाभुळकर यांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र तो थांबला नाही व वेगाने ट्रॅक्टर घेवून तो या भागातून तो पसार झाला. यावल पोलिस ठाण्यात तलाठी उमेश बाभुळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार बालक बार्‍हे करीत आहे.

 

Spread the love