हेमकांत गायकवाड
चोपडा- आळंदी देवाची येथे 100 वर्षांपेक्षाही जास्त काळ आधी संत जोग महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्था काढली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक कीर्तनकारांना घडवून समाजसेवेत कामाला लावले. हजारोंच्या कीर्तनकारांनी समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा अंधश्रद्धा याच्यावर प्रहार करून समाज सुधारण्याचे काम करण्याचे महान कार्य जोग महाराजांनी केले. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात उभा करण्यात जोग महाराजांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी .चौधरी यांनी आज दि.21 सप्टेंबर रोजी जोग महाराजांच्या जयंती निमित्त प्रतिपादन केले. यावेळी ह. भ. प .प्रसाद बागुल महाराज यानी जोग महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित कथानक सादर केले. जोक महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे जोग महाराज यांची जयंती संपन्न झाली. यावेळी ह .भ. प. गोपीचंद महाराज, ह. भ .प .बापू महाराज लासुर, ह .भ. प .प्रकाश महाराज, ह. भ. प. देवर्रे महाराज, ह.भ.प. संदीप चौधरी, ह.भ.प. रघुनाथ त्र्यंबक चौधरी, ह. भ. प .ज्ञानेश्वर चौधरी, जितेंद्र चौधरी, चंद्रकांत पाटील ,मुकुंद चौधरी , चंद्रकलाबाई चौधरी, सौ कल्पनाताई चौधरी ,विजयाबाई पाटील,राजेश मराठे ,मदन मिस्तरी ,भटू मिस्त्री, शुभम मराठे, निशांत निशांत चौधरी ,उमाकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.