दहिगाव गावाचे उपसरपंच किशोर महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार

0
11

यावल प्रतिनिधी –  प्रवीण मेघे

 यावल –  तालुक्यातील दहिगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच व गणेश दुध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन किशोर मधुकर महाजन यांचे अल्पशा आजाराने रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले . दहिगाव तालुका यावल येथील रहीवाशी व ग्राम पंचायतचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्त किशोर मधुकर महाजन वय६० वर्ष यांचे आज दिनांक १६जुलै रोजी अल्पशा आजाराने गोदावरी रुग्णालयात निधन झाले . भारतीय जनता पक्षाचे उमदा कार्यकर्ते अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती . किशोर मधुकर महाजन हे माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे तथा माजी खासदार व आमदार हरिभाऊ जावळे यांचे ते निकटवर्ती कार्यकर्ते होते. यावल पंचायत समितीच्या माजी सभापती संध्या महाजन या त्यांच्या पत्नी असुन , त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबात पत्नी , एक मुलगा नातंवडे असे कुटुंब असुन, आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर दहिगाव येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

Spread the love