दापोरा येथे हातभट्टीवर छापे”दारू बनविण्याचे तीनशे लीटर रसायन केले नष्ट” !! तालुका पोलीसांची कारवाई !!

0
10

             

जळगाव -तालुक्यातील दापोरा येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूचा उत आल्याने ६ रोजी जळगाव तालुका पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून अवैध रित्या पाडल्या जाणार्‍या हातभट्टी दारूचे ३०० लीटर कच्चे रसायन नष्ट केले.पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात आली. दापोरा येथे हातभट्टीची दारू पाडली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.त्यानंतर दापोरा शिवारातील गट नं ४० जवळ भट्टी लावून किशोर रमेश काळे वय ४५ यास ताब्यात घेऊन २०० लीटर दारू निर्मितीचे रसायन,२५ लीटर दारू नष्ट करण्यात येऊन ८७५० रुपयेचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.  व गट नं १६० जवळ शिवलवण नाल्यात जिभू वसंत गायकवड वय ३० यास देखील ताब्यात घेण्यात येऊन १०० लीटर दारू निर्मितीचे रसायन,वीस लीटर दारूसह ५००० रु किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. दोघेही आरोपी दापोरा येथील रहिवासी असून त्यांचेवर तालुका पोलिसात पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड यांचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टी वरील कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील,हे.कॉ.हरीलाल पाटील,अनिल मोरे,चेतन पाटील,महेंद्र सोनवणे,तुषार जोशी यांचे पथकाने कारवाई केली.

Spread the love