बुधगाव – येथील रहिवासी व राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे व रामकृष्ण धनगर हे आपल्या गावातील गोरगरिबांचे रेशनकार्ड बनण्यासाठी चोपडा तहसिल कार्यालयात जात असताना. हातेड ते चोपडा या रस्त्यावर अचानक गाडित बिघाड झाल्याने त्याचे वाहन बंद पडले.
त्यांच रस्त्याने येणारे अनवोळखी बाईक चालक यांनी साळुंखे यांना विचारले. व साळुंखे यांनी सामाजिक कार्यसाठी जात असे सांगितले असता. असे कळताच ते मदतीला धावुन आले. व त्यांनी बाईकला सुरळीत पद्धतीने पाय लावुन किमान ६ किमी. अंतर पार गाडी गॅरेज पर्यंत नेऊन सोडली . हे मदत करणारे व्यक्ती गणपुर (भवाळे) येशील अमोल न्हावी व मंगल न्हावी होते. व साळुंखे व धनगर यांनी दोघांचे मनापासून आभार मानले. येवढ्या कडक उन्हात मदतीला न ओळखत असताना धावुन आले. साळुंखे व धनगर या अनुभवलेल्या घटेनेतुन म्हणतात की आजुन हि माणुसकी जिवंत आहे. या प्रसंगातून त्यांना माणुसकी दर्शन घडुन आले. उर्वेश साळुंखे व रामकृष्ण धनगर हे समाजातील नागरिकांना आहवान करता कि असे काही प्रसंग रस्त्याने आढळल्यास काळजी पुर्वक तापास करून मदतीचा हात द्या वा. नक्की मनाला समाधान मिळाल्या शिवाय राहणार नाही.












