नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी तर्फे वाचन संकल्पचा कार्यक्रम
जळगाव – आपल्या आयुष्यातील अंधार जर दूर करायचे असेल तर त्याला वाचनाशिवाय पर्याय नाही असे इंगर्जी विभागाचे दशरथ चौधरी यांनी राज्य शासनाच्या *वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सागितले.
वाचन संकल्प अभियान कार्यक्रम कॉलेज ऑफ इंजीनीयरिंग अँड टेक्नॉलजी, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीमध्ये ७ रोजी पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
म्हणून असिस्टंट प्रोफेसर श्रम साधना ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी इंग्रजी विभागाचे दशरथ चौधरी उपस्थित होते. इंजीनियरिंगचे उपप्राचार्य प्रा. राहुल भोगे तसेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कॉलेजचे ग्रंथपाल सोपान पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले व कार्यक्रमाची रूपरेषा मांडली कार्यक्रमाला उपस्थित सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी या सगळ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक त्रिनेत्र तायडे यांनी केले तसेच कम्प्युटर विभागातील प्रा. मनीषा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम उत्कृष्ट पार पडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब आर. व्ही पाटील, उपाध्यक्ष विलास नायर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. एन. यांनी कौतुक केले .