भुसावळ तालुका पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनोळखी तरुणाचा मृतदेह ?

0
46

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वांजोळा – मिरगव्हाण रस्त्यावर असलेल्या शेतात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला असल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत दि.२३ डिसेंबर रोजी वांजोळा पोलीस पाटील संतोष भिका कोळी यांनी खबर दिली की, वांजोळा शिवारात मिरगव्हाण रस्त्यावर असलेल्या सोनाली सुरेश जैन यांच्या शेतात एक ३० ते ३५ वय असलेला तरुण झोपलेला आहे. या बाबत खात्री करण्यासाठी गेले. असता सदर तरुण मयत अवस्थेत आढळून आला. आहे.त्याच्या अंगावर ग्रे रंगाची नाईट पॅन्ट, काळ्या रंगाचे स्वेटर व काळसर रंगाचे टी शर्ट आणि उजव्या हाताच्या मनगटावर D.K.S. असे इंग्रजीत गोंधलेले आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ००४३/२०२३ कलम १७४ सीआरपीसी नुसार नोंद करण्यात आली. असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत असून या बाबत काही माहिती मिळाल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love